कॅनडात मार्क कार्नी यांचे सरकार   

लिबरल पक्षाला सर्वाधिक जागा

टोरँटो : कॅनडातील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने सर्वाधिक मते जिंकून सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. प्रतिस्पर्धी हुजूर पक्षाचे अनेक नेते पराभूत झाले आहेत. 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्म यांचे वाढीव आयात शुक्ल धोरण, व्यापार युद्ध आणि त्यापासून कॅनडाला निर्माण झालेला धोका, यावर कार्नी यांनी जोरदार प्रचार केला. तो मतदारांना भावला असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. कार्नी यांचे प्रतिस्पर्धी आणि पॉप्युलिस्ट काँझरव्हेटिव्ह पक्षाचे नेते, पंतप्रधान पदाचे उमेदवार पियरे पोइलिव्हर यांचा दारुण पराभव ओटावा मतदारसंघातून झाला. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याचेही पडसाद कॅनडात उमटले. त्यानी कार्नी यांच्या पारड्यात भरभरुन मते टाकून त्यांना आणि त्यांच्या पक्षाला विजयी केले. पियरे पोइलिव्हर यांनी अमेरिकेप्रमाणे कॅनडा फर्स्टचा नारा दिला होता. 

प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा

प्रचारात वापरला पण, निकालानंतर तो मतदारांना आकर्षित करु शकला नसल्याचे दिसले. त्यांनी माजी पंतप्रधान जस्टीन त्रुदो याच्या धोरणावर टीका केली होती. मात्र, तो प्रचार मतदारांच्या पचनी फारसा पडला नसल्याचे निकालानंतर स्पष्ट होत आहे. 

लिबरल पक्षाला बहुमत

कॅनडाच्या संसदेत ३४३ जागा आहेत. ७० लाख ३० हजार मतदारांनी सोमवारी मतदान केले होते. बहुमतासाठी १७२ जागा आवश्यक आहेत..कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने १६८ जागा जिंकल्या किंवा आघाडी घेतली आहे. केवळ चार जागांपासून पक्ष बहुमतापासून दूर आहे. अर्थात सर्वाधिक जागांसह मोठा पक्ष म्हणून लिबरल पुढे आला आहे. अजूनही काही जिल्ह्यांतील मतमोजणी बाकी आहे. 

पक्षीय बलाबल

एकूण जागा : ३४३
बहुमतासाठी जागा : १७२
लिबरल पक्ष : १६८
मजूर पक्ष : १४४
ब्लॉक क्युबेकॉस : २३
एनडीपी : ७
ग्रीन पार्टी  १

खलिस्तानवादी जगमित सिंग पराभूत

कॅनडातील डाव्या विचारसरणीच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि खलिस्तान समर्थक जगमित सिंग याचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे तातडीने पक्ष नेतेपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ब्रुनबे मध्य मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यात त्याचा काल दारुण पराभव झाला.
 

Related Articles